Monday, March 30, 2020

'वादळ' मराठी मनांच - बाळासाहेब ठाकरे 🚩



Balasaheb Thackeray


-------------------------------------------

भगवा माणूस 
रोक-ठोक बाणा 
शिवबांचा मावळा 
स्वराज्याचा ध्यास
मराठ्यांची आस 

बाळासाहेब ठाकरे 
🚩

- Creo


Monday, March 23, 2020

मी मनुष्य - कोरोनाग्रस्थ



हा आजचा ब्लॉग फक्त अन फक्त भारतीयांसाठी... 
२२'च्या देशव्यापी बंदनंतर आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर खरतर विनंतीचा म्हणा, वाटलं की लोक स्वतःसाठी, आपल्यांसाठी म्हणून तरी बंद पाळतील एव्हाना वाढवतील पण कसलं काय...

आमचा रुबाब काही औरच, जगात काय पण चालू असुदे राव! आम्हाला कुठं काय होणार? शक्य आहे का ते? ह्या गुर्मीत 'बंद' नंतरच्या दुसऱ्याच दिवशी निघालॊ आम्ही सगळी कामावर, फिरायला, परिस्थितीचा अंदाज घ्यायला???

मानसिकता बदलायची खरंच गरज आहे पाहूण कारण नंतर ती बदलायला माणसचं शिल्लक राहणार नाहीत....



मी मनुष्य - कोरोनाग्रस्थ

मी हतबल आहे, 
मी असहाय्य आहे. 
मी अवाक आहे. 
मी अचाट आहे. 
निशब्द मी,
स्तब्ध आहे....

मला ना कुणाशी देणे-घेणे 
मला ना कुणाचे उणेदुणे 
मनी न भीती कुणाची 
मला ना पर्वा कुणाची 
ना चिंता उद्याची  
ना चिंता जगाची 

मी मनुष्य 
मी अमानवी 
मी असामान्य, अपरंपार 
पण निर्लज्य अन बेफिकीर 
मी मलाच नडणार
मी माझाच कर्दनकाळ 

मी संकटग्रस्त
मी लपतो आहे 
मी थांबतो आहे 
मी संपतो आहे 

मीच तो
मीच तो 
मीच तो, माणूस.... 

नीच तो 
नीच तो 
नीच तो, माणूस....


: By Creo

Sunday, March 22, 2020

कळले तरी वळणार कधी



कळले तरी वळणार कधी

---------||---------

लहानपणी काही कळत नाही
तरुणपणी सार कळत पण वळत नाही
अन्
म्हातारपणी कळतही अन् वळतही 
        पण शरीर साथ देत नाही...

: By Creo