Tuesday, May 5, 2020

फौजी - आयुष्य येथेच संपत नाही...

फौजी


एक तरुण सैनिक...
सिमेवरती कुणाच्या तरी लहरीपणापायी अन अदृश्य दिशेनं आलेल्या गोळीन,
मरून गेल...
अवघ वीस वर्षाचा पोर ते...

                   आई - वडील,
                   शाळा - दोस्त,
                   गाव - शिवार,
                   झाड - पाड,
                   अन्
                   नद्या - किनार...
                               
अशा एक ना अनेक, युद्धाला किंचितसाही थारा नसणाऱ्या कितीतरी गोष्टी दोन-एक वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात होत्या. पण,
देश-सेवसाठी अन देश-संरक्षणाखातर सैन्यात भरती झालेलं ते पोर,       
क्षणात एका कवडीमोल गोळीन...   
मारलं गेलं. (पंड-पुढाऱ्यांच्या भाषेत शहीद झाल)

फौजी
                    
प्रत्येकालाच हौस नसते राव सैन्यात जाण्याची...          
गरजा असतात,
गरीबी असते,
घर चालवायचं असतय...
इच्छा असतात,
स्वप्ने असतात
कर्तव्य असतात
अशा एक ना अनेक असंख्य जबाबदाऱ्या खांद्यावर पेलून,
ते वीस-एक वर्षाचं पोर             
आई-बा पासून लांब,
जीवलगांच्या नजरपल्याड,
                             
सीमेवराती जातंय...
शहीद होतंय...
मरून जातय...
     
पण ,
कोवळ्या वयाच्या त्या जीवाच्या शहीद-त्वाच गांभीर्य सोडून आमचा देश, मीडिया व माणसं...
त्याच दिवशी          
  • जेलमधून सुटलेल्या कोण्या हिरोच्या बातम्यात 
  • निवडून आलेल्या कोण्या राजकारण्याच्या जल्लोषात
  • क्रिकेट संघान मिळवलेल्या विजयात रमतो...
किंवा कोणा कुठल्या ताज्या अन् फालतू विषयांमध्ये रमतो

परवाचाच , 
Pulwama terrorist attack मध्ये CRPF जवानांवर झालेला तो भ्याड हल्ला
करिब , 
५०'भर जवान शहीद झाले...
अन् आत्ताच्याच Handwara terrorist attack मध्ये आपले आणखी काही जवान देशासाठी कामी आले... 

कोण मराठा,
कोण शीख,
पारसी वा कोण मुसलमान नाही संपला.
तर, एक "फौजी" संपला...
            

  एकच सांगू इच्छितो,
     "फौजी मरतो अन् देश पोसतो" 
   ही शून्य मानसिकता सोडून भारत व भारतीय, जातीधर्मापासून खूप लांब, राजकारण व राजकारण्यांच्या पल्ल्याड जाऊन, भौतिक प्रलोभणापासुन खूप दूर अन् मूलभूत गरजा ओळखून,
    'देशहिताच्या व देशौन्नतीच्या' मार्गाने कधी जाणार,
     माहीत नाही....
इथे
खरी गरज मानसिकता बदलायची आहे
फौजी INDIA
INDIA

     "१९४७ पासून आत्तापर्यंत ह्या ७३ वर्षाच्या कालखंडातील
 भारताच्या कायापालटाच,
       फक्त हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं...
         - संपत



Reference
- Google
    - Shares

No comments:

Post a Comment