सिमेवरती कुणाच्या तरी लहरीपणापायी अन अदृश्य दिशेनं आलेल्या गोळीन,
मरून गेल... अवघ वीस वर्षाचा पोर ते...
आई - वडील,
शाळा - दोस्त,
गाव - शिवार,
झाड - पाड,
अन्
नद्या - किनार...
अशा एक ना अनेक, युद्धाला किंचितसाही थारा नसणाऱ्या कितीतरी गोष्टी दोन-एक वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात होत्या. पण, देश-सेवसाठी अन देश-संरक्षणाखातर सैन्यात भरती झालेलं ते पोर,
क्षणात एका कवडीमोल गोळीन... मारलं गेलं. (पंड-पुढाऱ्यांच्या भाषेत शहीद झाल)
प्रत्येकालाच हौस नसते राव सैन्यात जाण्याची...
गरजा असतात,
गरीबी असते,
घर चालवायचं असतय...
इच्छा असतात,
स्वप्ने असतात
कर्तव्य असतात
अशा एक ना अनेक असंख्य जबाबदाऱ्या खांद्यावर पेलून,
ते वीस-एक वर्षाचं पोर
आई-बा पासून लांब,
जीवलगांच्या नजरपल्याड,
सीमेवराती जातंय...
शहीद होतंय...
मरून जातय...
पण ,
कोवळ्या वयाच्या त्या जीवाच्या शहीद-त्वाच गांभीर्य सोडून आमचा देश, मीडिया व माणसं...
त्याच दिवशी
जेलमधून सुटलेल्या कोण्या हिरोच्या बातम्यात
निवडून आलेल्या कोण्या राजकारण्याच्या जल्लोषात
क्रिकेट संघान मिळवलेल्या विजयात रमतो...
किंवा कोणा कुठल्या ताज्या अन् फालतू विषयांमध्ये रमतो
ही शून्य मानसिकता सोडून भारत व भारतीय, जातीधर्मापासून खूप लांब, राजकारण व राजकारण्यांच्या पल्ल्याड जाऊन, भौतिक प्रलोभणापासुन खूप दूर अन् मूलभूत गरजा ओळखून,
'देशहिताच्या व देशौन्नतीच्या' मार्गाने कधी जाणार,
माहीत नाही....
इथे खरी गरज मानसिकता बदलायची आहे
INDIA
"१९४७ पासून आत्तापर्यंत ह्या ७३ वर्षाच्या कालखंडातील भारताच्या कायापालटाच,
Elon Musk असे नाव Google वरती शोधल्यावर तुम्हाला खालील माहिती सापडेल,
"Elon Reeve Musk एफआरएस एक अभियंता, औद्योगिक डिझाइनर, तंत्रज्ञान उद्योजक आणि समाजसेवी आहे. तो दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि कॅनडाचा नागरिक आहे."
पण मुळात फक्त हे सांगण्यासाठी हा लेख अजिबातच नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्या वाटचालीसंबंधी..... ह्या माणसाची वाटचाल सध्या अशी चाललेय की जशी काय त्याच्याकडे सूर्याची मालकी आहे कारण सौरऊर्जेचा त्याच्यापेक्षा उत्तम वापर आजपर्यंत कुणी केलाय असं वाटत नाही.
एकविसाव्या शतकात निसर्गाला आपल्यापुढे झुकायला लावणारा अन इतिहास बदलायच्या वाटेवर निघालेला हा माणूस. ज्या गोष्टींची सामान्य माणसाला स्वप्ने देखील पडत नसतील त्या कल्पना सत्यात उतरवणारा हा अजूबा.
उदाहरणच द्यायचे झाल्यास,
जगातील मोठं-मोठ्या संस्था, विख्यात शास्त्रज्ञ अन देश आपापल्यापरीने,
अंतरिक्षात राहण्यायोग्य जागा आहे का?
मंगळावर पाणी आहे का?
परग्रहवासी खरंच आहेत का?
अश्या एक ना अनेक प्रश्नांवर संशोधन करण्यात सारे जग व्यस्त आहेत अन अश्या काळात Elon Musk येत्या दशकभरात जवळ जवळ दहा लाख लोकांची वस्ती असणारे शहर मंगळावर वसविण्याची ग्वाही देतो.
Click on the Image to Play Song
SpaceX, Tesla, आणि SolarCity अश्या एक ना अनेक कंपन्यांचा सर्वेसर्वा असणाऱ्या ह्या माणसाचे त्याचा दृष्टिकोन स्पष्ट करणारे एक भाषण YouTube वर उपलब्ध आहे त्याची लिंक खाली दिली आहे एकदा जरूर पहा.
आम्ही घडवत असलेले भविष्य | Elon Musk
मनुष्य जातीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविण्यासाठी जगाला आणखी अश्याच माणसांची किंबहुना त्यांसारखा दृष्टिकोन ठेवणाऱ्या नवीन चेहऱ्यांची गरज आहे अन ज्या लेखातून एका जरी नवतरुणाला जगण्याचा जगव्यापी दृष्टिकोन मिळाला तरी हा लेख लिहिण्याचा माझा दृढतेने सफल झाला असं मी समजेन.
- संपत
........***........ (English Translation)
Elon Musk - The Miracle
Elon Musk
If you are Searching for Elon Musk on Google, you will find the following information:
"Elon Reeve Musk FRS is an engineer, industrial designer, technology entrepreneur, and philanthropist. He is a citizen of South Africa, the United States, and Canada."
But basically, this article is not just about this actually I wanna tell you about his journey ..... This man's journey is going on as if he owns the sun because no one seems to have used solar power better than him to date.
This is the man who made nature bow before us in the 21st century and set out to change history. Elon Musk made us realize the things which common men even can't dream of.
To give just one example,
The world's largest organizations, famous scientists and countries looking for the answer of questions like,
Is there a place to live in space?
Is there water on Mars?
Are there really aliens?
The world is busy researching one or more of these questions, and Elon Musk is all set to build a city of nearly a million people on Mars over the next decade.
Click on the Image to Play Song
There is a speech available on YouTube explaining the views of this man who owns one or more companies like SpaceX, Tesla, and SolarCity Be sure to check out the link below.
The future we're building -- and boring | Elon Musk
In order to take the human race to a different height, the world needs new faces with more or less the same views, and I think it was a resounding success to write this article, even if it gave a new worldview to a young person.
CORONA नावच एक जागतिक संकट सध्या आपल्या देशावर गेली कित्येक दिवस घोंगावताय. केंद्र सरकारने एकंदरीत परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे असाच म्हणावं लागेल.
परवाच ठाकरे साहेबांनी पत्राद्वारे दारूविक्री-उद्योग महसूल संबंधी अन त्यातून आर्थिक राज्याची आर्थिक स्थैर्य साधण्यासंबंधी मुख्यमंत्री साहेबांना काही सूचना दिल्या.
विचार रास्त होताच वरून उद्देशही बहुदा चांगला होता, महाराष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याचा...
त्या पत्राद्वारे खरंतर ठाकरे साहेबांनी अनेक मनातील विचारसरणीला वाचा फोडली. कोणाला ते पटलं तर काहींना खटकलं...
पण,
इथे हे सांगण्याचा अन समजावण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे तोच विस्तृत करण्याचा माझा प्रयत्न...
पण पुढे विषयात खोल-पर्यंत जायच्या आधी मी पहिलाच स्पष्ट करू इच्छितो की मी कोणाचा पुरस्कर्ता वा कोणाचा विरोधक नाही, मला विश्लेषक म्हणा हवं तर....
हे चित्र खुप बोलकं आहे आणि बहुदा तेवढंच पुरेसे आहे. मागचं सोडा पण यापुढे राज्य सरकारने कोणताही निर्णय घेताना जनतेची मुख्य गरज काय आहे ते समजून घ्याव अन त्यानुसारच समाज्याच्या तळागाळा-पर्यंत पण पोहोचणारे निर्णय घ्यावेत..."
A global crisis called CORONA has been raging in INDIA for the last couple of days now. But, we just have to say that the central government has handled the situation well.
In a letter, Mr. Thackeray gave some instructions to the Chief Minister regarding the sale of liquor and industry revenue and the financial stability of the state through it.
As soon as the idea was right, the MOTIVE from above was probably good, The economic stability of Maharashtra ...
In fact, through that letter, Mr. Thackeray broke the mindset of many. Some people like it, some people Don't.
But here, My approach to Pointing and Explaining this situation is different, my attempt to elaborate it ...
But before going too deep into the subject, I would first like to make it clear that I am neither a supporter nor an opponent of anyone, let alone an analyst...
so Middle-class people are struggling with issues like
Daily grocery
Office assignments
Newspaper unavailability
An Internet connection issue.
This picture is very eloquent and probably just enough. Leave it behind, but from now on, when the state government takes any decision, it should understand the main need of the people and accordingly, it should take decisions that reach the grassroots of the society ... "
- संपत
Wanna see some more articles on Maharashtra Politics