त्या सर्व बापांसाठी...
ज्यांन आपली पोरगी चुकीच्या ठिकाणी नांदायला देऊन गमावण्यापेक्षा अधिक समाज काय म्हणेल ह्या चिंतेत काहीच न करता हातात बांगड्या घातल्यासारखी नुसतं शंठ राहून गमावली...
![]() |
बापाच्या लेकी |
परक्या झालेल्या बापामुळं;
त्याची लेक'पण पोरकी होते...
लोकांचं म्हणणं एका बाजूला;
जावई-बापूंपुढे झुकणं दुसऱ्या बाजूला;
त्यांच्या घरातील दिवा तेवत राहण्याकरिता तुम्ही तुमच्या घरातील समई अर्पण केलेय;
ते विसरू नका...
वाकल्या कण्याची अन झुकल्या मानेची तर माकडेपण असतात,
हो म्हटलं कि हो अन नाही म्हटलं कि नाही !
पोरगी नाय ना खुश दिल्या घरी,
आण की तिला बिनधास्त माघारी.
धाड निरोप तिच्या दिल्या घरी,
माझी पोर आता माझ्याकडंच बरी.
लोकांची कसली आली फिकीर,
त्यांपेक्षा भुंकणारी कुत्री बरी.
बाप आहेस रं तू मर्दा,
उभा जन्म बापासारखाच वागणं,
ताठ मानेन जगणं अन ताठ कण्यांन चालणं.
आणखी काही मनाला भावणार...
No comments:
Post a Comment