Enjoy REAL Thoughts, Poematic compliments, and Introduction to Reality... Just on The4LinesQuotes.
Friday, May 29, 2020
Monday, May 18, 2020
जीवाची मुंबई | The City of Divine - Mumbai
जीवाची मुंबई
दिवसा दिवसाक हजारानी पावला डोळ्यात लाखानी सपना घेवनं मुंबईक जावक बाहेर पडतत आणि हयसर सगळेचजान ह्या मायानगरीत पोसले जातत.थांबना ह्या मुंबयकारांच्या रगातातक नसता तसा बघुक गेला तर मुंब्रानगरी आपल्या लोकांका तशी परवानगी सुधा देना नाय.
सायबा, हयसर सगळ्यात म्हागायचा काय आसात तर ता गप बसान रवाना मोकळो श्वास घेना...
![]() |
जीवाची मुंबई |
"पोटाची खळगी भरूकमुंबयक इलेलो माणूस,पैशाच्या पाटसून धावता धावतापोटाकच इसारलो"
- Creo
Look below for the English:
The City of Divine - Mumbai
Every day thousands of steps fall towards Mumbai with millions of dreams in their eyes and this Divine City carries everyone with big Heart. Stopping is not in the blood of Mumbaikars (People of Bombay) because MUMBRA'nagari (City of Goddess Mumbra) does not even allow its people to do so.
Bro, "Sitting quietly on the lounge and having a relief breath" - That's really a tough job here.
"A man who came to Mumbai
to fill his stomach,
In the process of running after money,
he forgot his stomach"
असेच आणखी काही लेख पहा:
Friday, May 15, 2020
अष्टविनायक
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभनिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
![]() |
अष्टविनायक |
आठपैकी अष्टविनायकांपैकी सहा तर पुण्यामध्येच आहेत,
पुणेकरांचेच आहेत म्हणा हवं तर...
कधी कधी तर मला,
गणपती हा फक्त ट्रस्टवाल्यांचाच देव वाटतो !
खरंच जर गणपतीही पुऱ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वसले असते तर बरं झालं असत...
गर्दीही टळली असती अन् गरीब भक्तांची वेगळी रांग व पैसेवाल्यांची वेगळी सोय तरी झाली नसती. निदान उगाच देवाच्या खासगीकरणाचा भास तरी झाला नसता...
"देवाची माणसं असतात, माणसांचा (मालकीचा) देव कधीच नसतो"
- संपत
Thursday, May 14, 2020
Thursday, May 7, 2020
काय करायलाय तळीराम...🍺
![]() |
काय करायलाय तळीराम...🍺 |
विचार काय हाय तुमचा वोतळीराम दादाविचार काय हाय तुमचा?देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारअन्घरा-दाराच वाटोळं करणार.
: आकाश चव्हाण
Tuesday, May 5, 2020
फौजी - आयुष्य येथेच संपत नाही...
फौजी
एक तरुण सैनिक...
सिमेवरती कुणाच्या तरी लहरीपणापायी अन अदृश्य दिशेनं आलेल्या गोळीन,
मरून गेल...
अवघ वीस वर्षाचा पोर ते...
अवघ वीस वर्षाचा पोर ते...
आई - वडील,
शाळा - दोस्त,
गाव - शिवार,
झाड - पाड,
अन्
नद्या - किनार...
अशा एक ना अनेक, युद्धाला किंचितसाही थारा नसणाऱ्या कितीतरी गोष्टी दोन-एक वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात होत्या. पण,
देश-सेवसाठी अन देश-संरक्षणाखातर सैन्यात भरती झालेलं ते पोर,
देश-सेवसाठी अन देश-संरक्षणाखातर सैन्यात भरती झालेलं ते पोर,
क्षणात एका कवडीमोल गोळीन...
मारलं गेलं. (पंड-पुढाऱ्यांच्या भाषेत शहीद झाल)
मारलं गेलं. (पंड-पुढाऱ्यांच्या भाषेत शहीद झाल)
प्रत्येकालाच हौस नसते राव सैन्यात जाण्याची...
गरजा असतात,
गरीबी असते,
घर चालवायचं असतय...
इच्छा असतात,
स्वप्ने असतात
कर्तव्य असतात
अशा एक ना अनेक असंख्य जबाबदाऱ्या खांद्यावर पेलून,
ते वीस-एक वर्षाचं पोर
आई-बा पासून लांब,
जीवलगांच्या नजरपल्याड,
सीमेवराती जातंय...
शहीद होतंय...
मरून जातय...
पण ,
कोवळ्या वयाच्या त्या जीवाच्या शहीद-त्वाच गांभीर्य सोडून आमचा देश, मीडिया व माणसं...
त्याच दिवशी
- जेलमधून सुटलेल्या कोण्या हिरोच्या बातम्यात
- निवडून आलेल्या कोण्या राजकारण्याच्या जल्लोषात
- क्रिकेट संघान मिळवलेल्या विजयात रमतो...
परवाचाच ,
Pulwama terrorist attack मध्ये CRPF जवानांवर झालेला तो भ्याड हल्ला
करिब ,
५०'भर जवान शहीद झाले...
अन् आत्ताच्याच Handwara terrorist attack मध्ये आपले आणखी काही जवान देशासाठी कामी आले...
कोण मराठा,
कोण शीख,
पारसी वा कोण मुसलमान नाही संपला.
तर, एक "फौजी" संपला...
एकच सांगू इच्छितो,
"फौजी मरतो अन् देश पोसतो"
ही शून्य मानसिकता सोडून भारत व भारतीय, जातीधर्मापासून खूप लांब, राजकारण व राजकारण्यांच्या पल्ल्याड जाऊन, भौतिक प्रलोभणापासुन खूप दूर अन् मूलभूत गरजा ओळखून,
'देशहिताच्या व देशौन्नतीच्या' मार्गाने कधी जाणार,
माहीत नाही....
इथे
खरी गरज मानसिकता बदलायची आहे
फक्त हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं...
- संपत
Reference
- Google
- Shares
Friday, May 1, 2020
Elon Musk - एक चमत्कार | Elon Musk - The Miracle
Elon Musk - एक चमत्कार
![]() |
Elon Musk |
Elon Musk असे नाव Google वरती शोधल्यावर तुम्हाला खालील माहिती सापडेल,
"Elon Reeve Musk एफआरएस एक अभियंता, औद्योगिक डिझाइनर, तंत्रज्ञान उद्योजक आणि समाजसेवी आहे. तो दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि कॅनडाचा नागरिक आहे."
पण मुळात फक्त हे सांगण्यासाठी हा लेख अजिबातच नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्या वाटचालीसंबंधी..... ह्या माणसाची वाटचाल सध्या अशी चाललेय की जशी काय त्याच्याकडे सूर्याची मालकी आहे कारण सौरऊर्जेचा त्याच्यापेक्षा उत्तम वापर आजपर्यंत कुणी केलाय असं वाटत नाही.
एकविसाव्या शतकात निसर्गाला आपल्यापुढे झुकायला लावणारा अन इतिहास बदलायच्या वाटेवर निघालेला हा माणूस. ज्या गोष्टींची सामान्य माणसाला स्वप्ने देखील पडत नसतील त्या कल्पना सत्यात उतरवणारा हा अजूबा.
उदाहरणच द्यायचे झाल्यास,
जगातील मोठं-मोठ्या संस्था, विख्यात शास्त्रज्ञ अन देश आपापल्यापरीने,
- अंतरिक्षात राहण्यायोग्य जागा आहे का?
- मंगळावर पाणी आहे का?
- परग्रहवासी खरंच आहेत का?
अश्या एक ना अनेक प्रश्नांवर संशोधन करण्यात सारे जग व्यस्त आहेत अन अश्या काळात Elon Musk येत्या दशकभरात जवळ जवळ दहा लाख लोकांची वस्ती असणारे शहर मंगळावर वसविण्याची ग्वाही देतो.
![]() |
Click on the Image to Play Song |
SpaceX, Tesla, आणि SolarCity अश्या एक ना अनेक कंपन्यांचा सर्वेसर्वा असणाऱ्या ह्या माणसाचे त्याचा दृष्टिकोन स्पष्ट करणारे एक भाषण YouTube वर उपलब्ध आहे त्याची लिंक खाली दिली आहे एकदा जरूर पहा.
आम्ही घडवत असलेले भविष्य | Elon Musk
मनुष्य जातीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविण्यासाठी जगाला आणखी अश्याच माणसांची किंबहुना त्यांसारखा दृष्टिकोन ठेवणाऱ्या नवीन चेहऱ्यांची गरज आहे अन ज्या लेखातून एका जरी नवतरुणाला जगण्याचा जगव्यापी दृष्टिकोन मिळाला तरी हा लेख लिहिण्याचा माझा दृढतेने सफल झाला असं मी समजेन.
- संपत
........***........
(English Translation)
Elon Musk - The Miracle
![]() |
Elon Musk |
If you are Searching for Elon Musk on Google, you will find the following information:
"Elon Reeve Musk FRS is an engineer, industrial designer, technology entrepreneur, and philanthropist. He is a citizen of South Africa, the United States, and Canada."
But basically, this article is not just about this actually I wanna tell you about his journey ..... This man's journey is going on as if he owns the sun because no one seems to have used solar power better than him to date.
This is the man who made nature bow before us in the 21st century and set out to change history. Elon Musk made us realize the things which common men even can't dream of.
To give just one example,
The world's largest organizations, famous scientists and countries looking for the answer of questions like,
- Is there a place to live in space?
- Is there water on Mars?
- Are there really aliens?
The world is busy researching one or more of these questions, and Elon Musk is all set to build a city of nearly a million people on Mars over the next decade.
![]() |
Click on the Image to Play Song |
The future we're building -- and boring | Elon Musk
Check out some more drug from this site:
Reference
Wikipedia, Google, TED - Youtube
Subscribe to:
Posts (Atom)
Labels
2019 election
21st century
Alcohol
Anxiety
ARMY
Being a woman
being maharashtrian.
blog
Bombay
champion
change
chatrapati
corona
COVID-19
Creo
Depression
Dreams
Drink
Elon Musk
fight
fighthard
George Floyd Death
Handwara attack
Humanity
India
king
kshatriya Kulavatans
life
Loveguru
Mumbai
nationalism
one nation
people
pixelbundle
Politics
poverty
Pulwama attack
quote
quotes
racism
Raj Thackeray
rich and poor diffrence
secularity
shivaji maharaj
society
Solarcity
SpaceX
surviver
Sushant Singh Rajput
Tesla
the4linequote
the4linequotes
theartistpage
understand
united states
will
woman saftey
अंकिता कांबळे.....R
अडचणी
अष्टविनायक
आकाश चव्हाण
एकच ध्यास
काडी-मोड
गणपती
जोडीदार
दिलं
देव
नवरी
पाठराखीण
प्रेम
बाप
मनुष्य
मुक्त विचार
मोकळा श्वास
राजकारण
लग्न
शिक्षण
शिवसेना
सखा
संपत
संसार
स्वप्न
हिंदुहृदयसम्राट